Palghar Fort : निसर्गाच्या सान्निध्यात; १,०७० फूट उंच पालघरमधील 'हा' किल्ला तुमचं पुढचं ट्रेकिंग डेस्टिनेशन

Shreya Maskar

पालघर

असावा किल्ल्याला 'असावागड' म्हणूनही ओळखले जाते. हा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात बोईसरजवळ स्थित आहे. वीकेंडला मित्रांसोबत येथे नक्की जा.

Palghar | google

असावा किल्ला

असावा किल्ल्यावर ट्रेकिंगचा भन्नाट अनुभव घेता येतो. प्राचीन काळी हा किल्ला किनारपट्टीवरील बंदरांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गांच्या संरक्षणासाठी एक टेहळणी बुरूज म्हणून वापरला जात असे.

Should be a fort | google

किल्ल्याची उंची

असावा किल्ला हा समुद्रसपाटीपासून सुमारे १,०७० फूट उंचीवर वसलेला आहे.हा किल्ला मराठा साम्राज्यांच्या काळाच्याही आधीचा आहे.

Height of the fort | google

किल्ला कोणी बांधला?

असावा किल्ल्याची निर्मिती प्राचीन काळी 'माहिकावती' येथील बिंबा राजाने केली असावी, असे मानले जाते.

Who built the fort? | google

इतिहास

डहाणू आणि तारापूर बंदरांना मुख्य भूमीशी जोडणाऱ्या व्यापारी मार्गांच्या संरक्षणासाठी प्राचीन काळी याची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्याचा ताबा कालांतराने बिंबा राज्य, गुजरात सल्तनत, पोर्तुगीज, मराठे आणि ब्रिटिश यांच्याकडे बदलत गेला.

History | google

निसर्ग सौंदर्य

पावसाळ्यात येथे दाट हिरवळ, शांतता पाहायला मिळते. किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. निसर्गाचे सुंदर फोटो येथे काढता येतात.

Beauty of nature | google

वास्तुकला

येथे तटबंदीच्या भिंतींचे अवशेष, मुख्य प्रवेशद्वार (महादरवाजा), खडकात कोरलेली पाण्याची मोठी टाके आणि 'गणेश गुफा' सारख्या गुहा पाहायला मिळतात.

Architecture | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : चारही बाजूंनी अथांग समुद्र अन् मध्यभागी भव्य किल्ला, मुंबईजवळच आहे दगडी बेटावरचा ऐतिहासिक जलदुर्ग

Sea Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...