Thane Travel : एकाच दिवशी करा ३ किल्ल्यांचा रोमांचक ट्रेक, मुंबईजवळ आहे 'हे' खास लोकेशन

Shreya Maskar

उन्हाळी ट्रिप

उन्हाळ्यात मित्रांसोबत भटकंतीचा प्लान करा. मुंबईजवळ सुंदर लोकेशन्स पाहायला मिळतात. ठाण्यात पळसगड हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे.

Summer | yandex

पळसगड

पळसगड किंवा पळसदुर्ग हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील आसागाव आणि माहुली गावाच्या परिसरात वसलेला आहे.

Palasgad fort | google

ट्रेकिंग

पळसगड मुंबईजवळील भन्नाट ट्रेकिंग स्पॉट आहे. पळसगड, माहुली आणि भंडारगड हा ट्रेकिंग समूह आहे. यामुळे तुम्हाला एकाच दिवसात तीन किल्ल्यांची रोमांचक भटकंती (ट्रेकिंग) करण्याचा अनुभव मिळतो.

Trekking | yandex

निसर्गाचे थरारक रूप

पळसगड हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. येथे रॉक क्लाइंबिंगचा देखील आनंद घेता येतो. येथे निसर्गाचे थरारक रूप पाहायला मिळते.

Palasgad fort | google

इतिहास

पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी दोन महिन्यांच्या वेढ्यानंतर माहुली, पळसगड आणि भंडारगड हे दुर्गत्रिकुट (त्रिकुट किल्ला) स्वराज्यात सामील करून घेतला.

Palasgad fort | google

मुंबईजवळील ऐतिहासिक किल्ले

मुंबईजवळ वसईचा किल्ला, कर्नाळा किल्ला, कोलाबा किल्ला , लोहगड, राजमाची, वांद्रे किल्ला, वरळी किल्ला, शिवडी किल्ला यांचा समावेश होतो.

Vasai Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Palasgad fort | google

NEXT : घनदाट जंगल अन् खोल दऱ्यांची सफर, सातपुडा पर्वतरांगांतील 'हे' ठिकाण निसर्गप्रेमींसाठी नंदनवन

Amravati Travel | google
येथे क्लिक करा...