Shreya Maskar
महाराष्ट्रातील अमरावती हे 'विदर्भाची राजधानी' म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन अंबादेवी मंदिर, विशाल मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांसाठी प्रसिद्ध आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यामध्ये, विशेषतः सातपुडा पर्वतरांगेच्या 'गावीलगड टेकड्या' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण उपशाखेवर वसलेला आहे.
जवळच चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथील आल्हाददायक हवामान, नयनरम्य ठिकाणे, हिरवीगार निसर्ग, खोलवर पसरलेल्या धुक्याची चादर पाहून तुम्ही वेडे व्हाल.
सेमाडोह आणि कोलकास येथील जंगल सफारी, नारनाळा किल्ला आणि येथील डोंगराळ व दाट सागवानची जंगले ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
येथील निसर्ग सौंदर्याच्या तुम्ही प्रेमात पडाल. दाट जंगले, खोल दऱ्या आणि समृद्ध वन्यजीवन येथे जवळून पाहायला मिळते.
मेळघाटजवळ गाविलगड किल्ला आहे. गाविलगड किल्ला ३०० वर्षे जुन्या रचनेसाठी, वास्तूंच्या अवशेषांसाठी आणि सातपुडा पर्वतरांगेतील निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखला जातो.
मेळघाट हे ठिकाण नागपूरपासून साधारणपणे २२५ किमी अंतरावर असून, परतवाडा शहरामार्गे येथे पोहोचणे सर्वात सोयीचे ठरते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.