Shreya Maskar
मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर आणि देवरुखपासून जवळ आहे. येथे थंड हवा अनुभवायला मिळते. तुम्ही उन्हाळ्यात येथे ट्रिप प्लान करू शकता.
मार्लेश्वर धबधबा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. प्रसिद्ध मार्लेश्वर गुहा-शिवमंदिराच्या सान्निध्यात हा धबधबा स्थित आहे.
मार्लेश्वर धबधब्याला तुम्ही कधीही भेट देऊ शकता. मात्र निसर्गाचे सुंदर रूप पाहायचे असेल तर पावसाळ्यात आवर्जून येथे फिरायला जा.
मार्लेश्वर धबधबा ट्रेकिंगचा भन्नाट स्पॉट आहे. मनमोहक हिरवळ आणि सुमारे ४०० ते ५०० पायऱ्यांची साहसी चढाई यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर धबधबा हा महाराष्ट्रातील असा दुर्मिळ धबधबा आहे जो वर्षाचे १२ ही महिने वाहतो. अगदी कडक उन्हाळ्यातही प्रवाहित राहतो.
मार्लेश्वर धबधब्याला धारेश्वर धबधबा असे म्हणतात. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता. येथे परदेशी पर्यटकही येतात.
संगमेश्वर किंवा देवरुखवरून मार्लेश्वरसाठी एस.टी. बस आणि खाजगी गाड्या उपलब्ध आहेत. उंचावरून कोसळणाऱ्या पांढऱ्या, शुभ्र धबधब्यांचे रूप पाहून तुम्ही भारावून जाल.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.