Shreya Maskar
पालक वडी बनवण्यासाठी पालक, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, बाजरीचे पीठ, तेल, तीळ इत्यादी साहित्य लागते.
पालक वडी बनवण्यासाठी धने, जिरे, लसूण, हिरवी मिरची, हळद, मीठ, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि मोहरी इत्यादी मसाले लागतात.
पालक वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम धने, जिरे, लसूण आणि हिरवी मिरची घालून चांगले एकत्र वाटून घ्या.
त्यानंतर पालक चांगला धुवून बारीक चिरून घ्या.
पालकमध्ये मिरचीच ठेचा, मीठ आणि हळद मिक्स करून घ्या.
यात बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तीळ आणि बाजरीचे पीठ घालून घट्ट कणीक मळून घ्या.
तयार कणकेचा गोल रोल करून २० मिनिटे शिजवून घ्या.
वाफवलेल्या पालक वड्या तेलात खरपूस भाजून घ्या.