Siddhi Hande
रोज नाश्त्याला पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही पालक पोहे वडे बनवू शकतात.
पालक पोहे वडे बनवण्यासाठी पालक, पोहे, साबुदाणा, मिरची, दही, कोथिंबीर, सोडा आणि मीठ हे साहित्य लागणार आहे.
सर्वात आधी साबुदाणा ७ ते ८ तास भिजत ठेवा.
पोहे १ मिनिट भिजत ठेवा. त्यातील पाणी काढून घ्या आणि १० मिनिटे झाकून ठेवा.
पालक छान बारीक चिरुन घ्या. नंतर भिजलेल्या पोह्यात पालक, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाका.
यानंतर यात साबुदाणा मिक्स करा. हे मिश्रण एकत्रित मिक्स करा.
यानंतर हे वडे एका प्लास्टिकच्या कागदावर थापून घ्या.
यानंतर एका कढईत तेल गरम करा. त्यात हे वडे तळून घ्या.
Next: ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू