Shruti Vilas Kadam
२ कप गव्हाचे पीठ, १ कप पालक, १ हिरवी मिरची, १ चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी व तेल घ्या.
पालकाची पाने स्वच्छ धुऊन घ्या. गरजेनुसार थोड्या गरम पाण्यात पालक हलका शिजवून घ्या आणि थंड झाल्यावर त्याची बारीक पेस्ट तयार करा.
गव्हाच्या पिठात पालकाची पेस्ट, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, जिरेपूड आणि मीठ घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या.
मळलेल्या पिठाचे समान आकाराचे गोळे करा. त्यावर थोडे कोरडे पीठ लावून पोळपाटावर गोल पराठे लाटून घ्या.
गरम तव्यावर पराठा ठेवा. दोन्ही बाजूंनी हलके भाजल्यानंतर थोडे तेल किंवा तूप लावा आणि पराठा सोनेरी डाग येईपर्यंत भाजून घ्या.
दोन्ही बाजूंनी छान भाजलेले, मऊ आणि चविष्ट पालक पराठे ताटात काढा. अधिक चवदार बनवण्यासाठी वरून थोडे तूप लावू शकता.
पालक पराठे दही, लोणचे किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. लहान मुलांच्या डब्यासाठीही हा एक चविष्ट पर्याय ठरू शकतो.