Manasvi Choudhary
दिवाळीतील सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चकली. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच चकली खायला आवडते.
हेल्दी अन् टेस्टी पालकची चकली घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे. खास दिवाळीनिमित्त घरच्याघरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता.
पालकची चकली बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, चण्याचे पीठ, बटर, पालक पाने, हिरवी मिरची, मीठ, पांढरे तीळ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात गॅसवर पाणी गरम करा. त्यात स्वच्छ धुतलेली पालकची पाने आणि मिरची उकळवून घ्या.
नंतर उकळलेली पालकची पाने आणि हिरवी मिरची हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्या त्याची पेस्ट तयार करा.
एका भांड्यात तांदळाचे पीठ व चण्याचे पीठ घ्या त्यात मीठ, तीळ, बटर व पालक- मिरचीची पेस्ट छान मिक्स करा आणि मिश्रण चांगले मळून घ्या.
यानंतर चकलीच्या भांड्याच्या सहाय्याने मिश्रण भरून त्याच्या गोलाकार चकल्या पाडून घ्या. हे मिश्रण घालून चकल्या पाडून घ्या आणि गॅसवर कढईत गरम तेलामध्ये पालकच्या चकल्या कुरकुरीत तळून घ्या.