Manasvi Choudhary
पावसाळ्यात गरमा गरम पालकची भजी खाण्याची मज्जा काहीशी वेगळीच असते. संध्याकाळी चहासोबत कुरकुरीत पालक भजी खायला लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतात.
पालकची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही घरीच ही भजी बनवू शकता.
चण्याच्या डाळीची भजी बनवण्यासाठी पालक, बेसन, जिरा पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, खाण्याचा सोडा, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद, मसाला, आणि तेल हे साहित्य एकत्र करा.
भजी बनवण्यासाठी सर्वातआधी पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
एका मोठ्या बाऊलमध्ये चिरलेला पालक आणि उभा चिरलेला कांदा हे मिश्रण एकत्र करा.
पालक आणि कांदा या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून एकत्र मिक्स करा.
आता मिश्रणात आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, ओवा, हळद, लाल तिखट, धने पावडर आणि कोथिंबीर घाला.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये पालकची भजी सोनेरी रंग होईपर्यंत चांगली फ्राय करा.