Shruti Kadam
पैठणी हे महाराष्ट्रातील प्राचीन वस्त्रकलेचे प्रतीक आहे. या साडीपासून बनवलेला घागरा परंपरेला आधुनिकतेची जोड देतो.
पैठणी साडीचा घागरा बनवताना फार जपून पैठणीचे काम करावे लागते, ज्यामुळे त्याला एक खास झळाळी आणि सौंदर्य प्राप्त होते.
या घागऱ्यावर असलेले मोर, कमळ, आंबा, अशा पारंपरिक डिझाईन्स हाताने विणलेले असतात, जे पैठणीची खासियत ठरतात.
पैठणी साडीचा घागरा हे परिधान केल्यावर शाही आणि डौलदार लुक मिळतो, त्यामुळे विवाह, साखरपुडासाठी हा आऊटफिट परफेक्ट वाटतो.
पैठणी ही महाराष्ट्राची शान मानली जाते. घागऱ्याच्या रूपात ती परिधान केल्याने आपली संस्कृती जोपासल्याचा अनुभव येतो.
प्रत्येक पैठणी साडी वेगळी असते, त्यामुळे घागरा देखील युनिक वाटतो.
पारंपरिक घागऱ्यावर मॉडर्न ब्लाउज किंवा क्रॉप टॉप परिधान करून फ्युजन लुक तयार करता येतो, जो आजच्या पिढीला आकर्षक वाटतो.