Shruti Vilas Kadam
पैठणी साडीच्या काठ आणि पदरापासून तयार केलेला अनारकली ड्रेस रॉयल आणि ग्रेसफुल लूक देतो. लग्न, सण-समारंभ आणि खास कार्यक्रमांसाठी हा डिझाईन फारच फेमस आहे.
लांब फ्लेअर आणि आधुनिक कट असलेला पैठणी गाउन तरुणींमध्ये ट्रेंडमध्ये आहे. पारंपरिक पैठणी काठ आणि वेस्टर्न स्टाइल यांचा सुंदर मिलाफ या डिझाईनमध्ये दिसतो.
पैठणी कापडापासून बनवलेली कुर्ती आणि त्यासोबत फ्लेअर स्कर्ट हा डिझाईन आरामदायी तसेच एलिगंट दिसतो. हळद-कुंकू आणि घरगुती समारंभांसाठी योग्य.
पैठणी साडीच्या काठासोबत वेस्टर्न पॅटर्न वापरून तयार केलेले ड्रेस वेगळा आणि ट्रेंडी लूक देतात. पार्टी आणि रिसेप्शनसाठी हा डिझाईन परफेक्ट ठरतो.
पैठणी काठाचा वापर करून बनवलेले जॅकेट आणि आत साधा ड्रेस असा हा डिझाईन सध्या खूपच फॅशनेबल आहे. यामुळे पारंपरिकतेला आधुनिक टच मिळतो.
पैठणी बुट्ट्यांसह तयार केलेला लाँग फ्रॉक तरुण मुलींसाठी आकर्षक पर्याय आहे. हा डिझाईन हलका असूनही पारंपरिक लूक देतो.
पैठणी काठ लावलेली कुर्ती आणि पॅन्ट यांचा कॉम्बिनेशन कॅज्युअल तसेच फेस्टिव्ह लूकसाठी योग्य आहे. ऑफिस फंक्शन किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी हा डिझाईन उपयुक्त ठरतो.