Special Hairstyle: पार्टी, फंशन किंवा लग्नासाठी साडीवर करा 'या' सोप्या आणि सुंदर हेअरस्टाईल

Shruti Vilas Kadam

पारंपरिक बन

साडीवर सर्वाधिक लोकप्रिय आणि क्लासिक हेअरस्टाईल म्हणजे बन. मोगऱ्याची वेणी, गजरा किंवा केसांमध्ये फुलं लावल्यास हा लूक अधिक सुंदर दिसतो. लग्न आणि सणांसाठी ही हेअरस्टाईल परफेक्ट आहे.

Special Hairstyle

साइड ब्रेड

साइडला काढलेली वेणी साडीवर खूपच एलिगंट दिसते. ही हेअरस्टाईल पारंपरिक तसेच मॉडर्न साड्यांवरही शोभून दिसते. वेणीत अ‍ॅक्सेसरीज लावल्यास लूक खुलून येतो.

Special Hairstyle

मिडल पार्टिंग ओपन हेअर्स

सरळ किंवा हलक्या वेव्ही ओपन केसांसोबत साडी घातल्यास ग्रेसफुल लूक मिळतो. ऑफिस पार्टी किंवा रिसेप्शनसाठी ही सोपी आणि स्टायलिश हेअरस्टाईल आहे.

Special Hairstyle

लो बन

मानेला खाली बांधलेला लो बन साडीवर रॉयल आणि सॉफिस्टिकेटेड लूक देतो. सिल्क किंवा कॉटन साड्यांवर ही हेअरस्टाईल खास दिसते.

Special Hairstyle

कर्ली हेअर्स विथ साइड पिन

कर्ल्स करून केस साइडला पिन केल्यास साडीवर ट्रेंडी लूक मिळतो. ही हेअरस्टाईल तरुण मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Special Hairstyle

फिशटेल ब्रेड

फिशटेल वेणी साडीवर वेगळा आणि फॅशनेबल टच देते. पार्टी किंवा फेस्टिव्हल लूकसाठी ही हेअरस्टाईल उत्तम पर्याय आहे.

Special Hairstyle

हाफ बन – हाफ ओपन हेअर्स

अर्धे केस बनमध्ये आणि अर्धे केस मोकळे ठेवलेली ही हेअरस्टाईल मॉडर्न साड्यांसाठी परफेक्ट आहे. कॉलेज फंक्शन किंवा हलक्या कार्यक्रमांसाठी हा लूक खास दिसतो.

Special Hairstyle

Makeup Tips: ब्लश, ब्रॉन्झर आणि हायलाइटरमध्ये नेमका फरक काय?

Makeup Tips
येथे क्लिक करा