Shreya Maskar
मसाला मॅगी बनवण्यासाठी मॅगी नूडल्स, काळी मिरी पावडर, पाणी, मक्याचे दाणे, लिंबू, कोथिंबीर, चीज, भाज्या, शेजवान आणि चिली फ्लेक्स इत्यादी साहित्य लागते.
मॅगी बनवण्यासाठी पॅनमध्ये पाणी उकळून त्यात नूडल्स टाका.
मॅगी शिजायला लागल्यावर मॅगी मसाला घाला.
त्यानंतर यात काळी मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स टाका.
यात आवडीनुसार चिरलेल्या भाज्या आणि मक्याचे दाणे टाकून मिक्स करा.
मॅगीमध्ये जास्त पाणी राहणार नाही आणि ती जास्त शिजणार नाही, याची काळजी घ्या.
मॅगी शिजायला लागली की त्यात कोथिंबीर, शेजवान चटणी आणि चीज टाका.
गॅस बंद करून शेवटी थोडा लिंबाचा रस पिळा. चटपटीत पहाडी-स्टाइल मसाला मॅगी तयार झाली.