Shreya Maskar
पहाडी रायता बनवण्यासाठी दही, काकडी, तेल, जिरे, मीठ, मिरची, हिंग इत्यादी साहित्य लागते.
पहाडी रायता बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये दही फेटून घ्या.
त्यानंतर यात मोहरीचे तेल टाकून सर्व मिक्स करून अर्धा तास ठेवा.
आता दुसरीकडे काकडीचे बारीक काप करून घ्या.
काकडीचे काप तेलात घालून दह्यामध्ये मिक्स करा.
रायत्याला फोडणी देण्यासाठी त्यात मिरचीचे तुकडे, कढीपत्ता , जिरे, हिंग टाकून चांगले परतून घ्या.
आता काकडी आणि दही मिक्स करून त्यावर फोडणी द्या.
पहाडी रायता जेवणाची रंगत वाढवेल.