Shreya Maskar
पद्मदुर्ग किल्ल्याला कासा किल्ला असे म्हणतात. पद्मदुर्ग किल्ला १७ व्या शतकातील एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. पद्मदुर्ग किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये, मुरुड गावाच्या किनाऱ्यापासून अरबी समुद्रात वसलेला आहे.
या किल्ल्याचा आकार कमळाच्या फुलासारखा (पद्म म्हणजे कमळ) असल्यामुळे याला 'पद्मदुर्ग' नाव देण्यात आले आहे. तुम्ही येथे वीकेंडला ट्रिप प्लान करू शकता.
पद्मदुर्ग मुरुड-जंजिरा किल्ल्याच्या अगदी जवळ अरबी समुद्रात स्थित आहे. जो जंजिऱ्याच्या वायव्येला सुमारे ४ किमी अंतरावर एका खडकावर उभा आहे.
पद्मदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीच्या जंजिऱ्याला शह देण्यासाठी १६७६ मध्ये बांधला होता. या किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे.
मुरुड-कोळीवाडा येथून बोटीने प्रवास करून पद्मदुर्ग किल्ल्यावर पोहोचता येते. येथून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते, त्यामुळे हा किल्ला पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
पद्मदुर्ग किल्ला बेसाल्ट खडकांनी (Basalt rock) बनलेला आहे. पद्मदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवर साधारण 60 फूट अंतरावर सहा भक्कम आणि वैशिष्ट्यपूर्ण बुरुज आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत मराठा नौदलासाठी जहाजबांधणीचे महत्त्वाचे केंद्र होता. पद्मदुर्ग मराठा नौदलाचा एक मजबूत तळ होता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.