Ankush Dhavre
काही पक्षी आपल्या सौंदर्यामुळे लोकांना आकर्षित करतात .
तर काहींचा आवाज हा नेहमीच ऐकावासा वाटतो.
मात्र आम्ही आज तुम्हाला अशा पक्षीबद्दल सांगणार आहोत ज्याला निसर्गाचा डॉक्टर असं म्हटलं जातं.
आता डॉक्टर का म्हणतात? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल
आम्ही ऑक्सपेकरबद्दल बोलतोय. जो प्राण्यांना मदत करतो.
हा प्रक्षी जनावरांच्या नाकातील आणि कानातील किडे आणि पॅरासाईट खाण्याचं काम करतो.
जे प्राणी जखमी झाले आहेत त्यांचं मांस देखील खाऊन टाकतात.
त्यामुळे जखम लवकर बरी होते आणि त्यांना इन्फेक्शन देखील होत नाही.