Saam Tv
दूध, दही, पनीर, नाचणी, तीळ यांसारखे पदार्थ तसेच हिरव्या पालेभाज्या यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. हाडांच्या मजबूतीसाठी हे पदार्थ खाणे गरजेचे असते.
व्हिटॅमिन शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंटसचा वापर करा.
चालणे, जिने चढणे, स्क्कॅट्स आणि योग्य व्यायाम हाडे आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करतात.
डाळी, कडधान्ये , अंडी, दूध, दही, पनीर, मासे किंवा इतर प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे स्नायू मजबूत होतात.
धुम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांमुळे हाडांच्या आरोग्यामुळे परिणाम होतो. हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करणे धोक्याचे आहे.
कमी वजनामुळे फ्रॅक्चर होण्याच्या समस्या आणि दुखापत होण्याची भीती जास्त असते. याशिवाय अतिवजनामुळे देखील फ्रॅक्चर होऊ शकतो.त्यामुळे वजन नियंत्रित ठेवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.