Saam Tv
पावसाळ्यात घाम आणि ओलाव्यामुळे टाळूवर तेलकटपणा वाढतो. त्यामुळे शॅम्पूने केस आठवड्यातून २ ते ३ वेळा धुवा.
आयली स्कॅल्पवर वारंवार तेल लावू नका. यामुळे केस आणखी चिकट होतात. तेल लावत असल्यास कमी प्रमाणात लावून काही वेळाने केस धुवून टाका.
पावसात भिजल्यानंतर किंवा धुतल्यानंतर ओले केस लगेचच कोरडे करा. तसेच राहिल्यास टाळूवर ओलावा वाढू शकतो. केसांना कुबट वास येतो.
कंडिशनर थेट स्कॅल्पवर लावल्यास केसांची मुळे अधिक तेलकट वाटतात. त्यामुळे तो केसांच्या मधल्या भागापासून टोकांपर्यंत लावा.
टाळूवर कोरफड जेल लावल्याने केसांवर थंडावा जाणवतो. कोरफड जेल लावल्यानंतर शॅम्पूने धुवा. यामुळे केसांतील अतिरिक्त तेल कमी होईल
लिंबाच्या रसात पाणी मिसळून केसांना लावल्याने केसांच्या मुळांमधील तेलकटपणा आणि चिकटपणा दूर होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.