Saam Tv
माणसाला सर्पदंश झाल्यावर औषध दिले जाते. त्यामुळे माणसाचा प्राण वाचतो पण तुम्हाला माहित आहे का, हे औषध कशापासून बनवल जाते?
विषारी सापांमधून विष काढण्याच्या प्रक्रियेला 'मिल्किंग' म्हणतात. सर्पदंश झाल्यावर विष उतरवण्यासाठी दिले जाणारे औषध घोड्यांपासून तयार केले जाते.
घोडे आकाराने मोठे आणि मजबूत असल्याने त्यांच्यात मोठ्या प्रमाणात अँटिबॉडिज तयार करणे शक्य असते. त्यामुळे यासाठी फक्त घोड्यांचाच वापर केला जातो.
सापाचे विष काढून ते अतिशय कमी आणि सुरक्षित प्रमाणात घोड्याला दिले जाते. घोड्याची रोगप्रतिकारकशक्ती त्या विषाविरूद्ध लढून अँटिबॉडिज तयार करते.
घोड्याच्या शरीरात योग्य प्रमाणात अँटीबॉडिज निर्माण झाल्यावर रक्ताचा काही भाग प्लाझ्मा काढला जातो.
या प्लाझ्मावर प्रक्रिया करून सर्पदंशावर उपचार करण्यासाठी 'अँटिव्हेनम' तयार केले जाते. ज्यामुळे माणसाचा जीव वाचतो .
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.