Manasvi Choudhary
ओवा स्वयंपाकघरातील एक अत्यंत गुणकारी मसाला आहे. पोटाच्या अनेक समस्यांवर ओवा औषधासारखे काम करतो.
रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी पिण्याची अनेकांना सवय आहे. पचनाच्या समस्यांसाठी ओव्याचे पाणी पिणे हा गुणकारी उपाय आहे.
ओव्याचे पाणी प्यायल्याने पहिल्याच आठवड्यात जेवणानंतर पोटात जाणवणारा जडपणा किंवा आळस कमी होतो आणि अन्न सहज पचते.
जर तुम्हाला वारंवार पोट फुगणे, अपचन किंवा गॅसचा त्रास होत असेल, तर ओव्याचे पाणी प्रभावी आहे. हे पोटातील वायू बाहेर टाकण्यास मदत करते.
अनेक लोकांना रात्री झोपताना किंवा जेवल्यानंतर ॲसिडिटी आणि छातीत जळजळीचा त्रास होतो. अशा वेळी रात्री ओव्याचे पाणी पिणे अत्यंत गुणकारी ठरते.
सलग २१ दिवस हे पाणी प्यायल्याने चरबी वेगाने जळण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञाानावर आधारित आहे. अघिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.