Manasvi Choudhary
मधुमेह हा आजार सामान्य असेल तरी डायबिटीजच्या रुग्णांना खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी लागते.
गोड पदार्थ किंवा गोड फळे खाताना अनेकदा प्रश्न समोर येतात. अशातच डायबिटीजचे रूग्ण केळी खाऊ शकतात का? याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
केळीमध्ये नैसर्गिक साखरआणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त केळी खाणे डायबिटीजच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते.
कमी पिकलेली केळी हिरव्या रंगाच्या केळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो त्यामुळे ती डायबिटीजचे रूग्ण खाऊ शकतात. यामुळे शरीरातील साखर अचानक वाढत नाही.
डायबिटीजच्या रुग्णांनी पूर्ण पिकलेली मऊ केळी खाण्याऐवजी थोडी कमी पिकलेली केळी खाणे अधिक सुरक्षित मानले जाते.
जास्त पिकलेल्या किंवा काळे डाग पडलेल्या केळीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढलेला असतो. अशा केळी खाल्ल्याने शुगर वेगाने वाढू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.