पिकलेल्या केळीपासून 5 मिनिटांत बनवा 5 चविष्ट रेसिपी, बच्चेकंपनी आवडीने खातील

Manasvi Choudhary

केळी

बाजारातून आणलेली केळी काही दिवसांनी जास्त पिकली तर ती मऊ, काळी पडतात. अशी केळी खाण्याची इच्छा होत नाही. शेवटी ती फेकून दिली जातात.

Banana

पिकलेल्या केळींपासून बनवा चविष्ट पदार्थ

मात्र तुम्हाला माहितीये का ? पिकलेली केळी फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यापासून अत्यंत चवदार 5 रेसिपी बनवू शकता

Overipe Banana Recipe

मऊ बनाना केक

केळी जास्त पिकलेली असतील तर त्यांपासून तुम्ही मऊ केक बनवा. केळीचा गर, मैदा किंवा गव्हाचे पीठ, गूळ किंवा साखर, थोडे तेल आणि बेकिंग पावडर मिक्स करून तुम्ही ओव्हन किंवा कुकरमध्ये स्पॉन्जी केक बनवा.

Eggless Banana Cake

बनाना पॅनकेक

जर लहान मुले केळी खाताना नाक-मुरडत असतील, तर त्यांना पॅनकेक बनवून द्या. पिकलेली केळी चांगली मॅश करा, त्यात थोडे गव्हाचे पीठ किंवा ओट्सचे पीठ, दूध आणि वेलची पूड मिक्स करा आणि तव्यावर मिश्रण टारून पॅनकेक बनवा.

Healthy Banana Pancakes

बनाना-ओट्स स्मूदी

मिक्सरच्या भांड्यात पिकलेली केळी, ताजे दही, ओट्स आणि मध एकत्र करून बारीक करा. घरच्या घरी 'बनाना स्मूदी' तयार होईल.

Banana Smoothie

बनाना मिल्क शेक

पिकलेल्या केळीपासून तुम्ही बनाना मिल्क शेक बनवू शकता. ही सर्वात सोपी रेसिपी आहे. पिकलेली केळी, थंड दूध, ड्रायफ्रूट्स आणि साखर किंवा गूळ मिक्सरमध्ये बारीक करा. घरच्या घरी मिल्क शेक तयार होईल.

Creamy Banana Milkshake

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: कचरा म्हणून फेकून देऊ नका! 'आरोग्याचा खजिना' आहेत फणसाच्या बिया; 'हे' ५ फायदे तुमच्यासाठी उपयोगी

Health Benefits Of Jackfruit Seeds
येथे क्लिक करा...