कचरा म्हणून फेकून देऊ नका! 'आरोग्याचा खजिना' आहेत फणसाच्या बिया; 'हे' ५ फायदे तुमच्यासाठी उपयोगी

Manasvi Choudhary

फणस

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सुरूवातील फणसाचे सेवन केले जाते. अनेकजण फणसाचे गरे आवडीने खातात.

Jackfruit

फणसाच्या बियांचे फायदे

फणस खाल्ल्यानंतर त्यातील गरे आपण सहसा फेकून देतो. पण तुम्हाला माहितीये का? फणसाच्या बियां देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Health Benefits Of Jackfruit Seeds

पौष्टिक घटक

फणसाच्या बियांमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि बी, पोटॅशियम, झिंक, लोह हे पौष्टिक घटक असतात.

Superfoods

पचनक्रिया सुधारण्यास होते मदत

फणसाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनासाठी फायदा होतो. ज्यांना  बद्धकोष्ठता , गॅस किंवा अपचनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी या बिया उकडून किंवा भाजून खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे आतड्यांचे आरोग्य उत्तम राहते.

Improves Digestion

रक्ताची कमतरता होते दूर

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही फणसाच्या बियांचे सेवन करा. फणसाच्या बियांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने, ते शरीरात नवीन रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात आणि थकवा दूर करतात.

Cures Anemia / Iron Rich

मेंदूचे कार्य सुधारते

फणसाच्या बियांमधील व्हिटॅमिन बी या घटकांमुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. मेदूंची कार्यक्षमता वाढते. स्मरणशक्ती वाढवते

Boosts Brain Function

चेहऱ्यावरील सुरकुत्या होतात कमी

चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर फणसाच्या बियांचे सेवन करा यातील अँटीऑक्साईड्स त्वचेवरील सुरकुत्या कमी करतील. त्वचेचे फ्री-रॅडिकल्सपासून रक्षण करतात, ज्यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण आणि चमकदार दिसते.

Anti-Aging Benefits

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फणसाच्या बियांचे सेवन करा. यामुळे ताण, थकवा दूर होण्यास मदत होईल.

Boosts Immunity

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: ना जिमची गरज, ना डाएटची! या हिरोईनसारखं बारीक दिसण्यासाठी खा 5 फळे

Weight Loss Tips
येथे क्लिक करा...