ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
जास्त गोड खाण्याची सवय डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
जास्त गोड खाल्ल्याने डोळ्यांच्या लहान रक्तवाहिन्या खराब होतात आणि दृष्टी हळूहळू कमी होऊ लागते.
अतिप्रमाणात गोड खाल्ल्याने सुरुवातीला अंधुक दिसणे, रात्री कमी दिसणे किंवा फ्लोटर्सची समस्या होणे अशी लक्षणं दिसतात.
सतत जास्त गोड खाल्ल्याने डोळ्यावर ताण येतो. तसेच डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आहारात ड्राय फ्रुट्स, हिरव्या भाज्यांचा समावेश करा. तसेच डोळ्यांची नियमित तपासणी करा.