Manasvi Choudhary
दिवाळीला नवीन कपडे परिधान केले जातात. तुम्हालाही यंदा दिवाळीत उठून दिसणारे कपडे परिधान करायचे असतील तर भगव्या रंगाची निवड करा.
महिलांसाठी बाजारात भगव्या रंगाच्या साड्यामध्ये अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न्स आहेत. ते तुम्ही निवडू शकता.
भगवा म्हणजेच ऑरेंज रंग हा अत्यंत पवित्र, सकारात्मक ऊर्जा देणारा आणि शुभ मानला जातो. दिवाळीत या रंगाचे कपडे परिधान केल्यास लूक फ्रेश दिसतो.
महिलांना सिल्क साड्या अधिक आवडतात. यंदा दिवाळीमध्ये सिल्क साड्यामध्ये भगव्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता.
बांधणी साडी म्हणजे महिलाचं विशेष प्रेम असतं. तुम्हालाही बांधणी साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही केशरी रंगाची निवड करा. केशरी आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन असलेली बांधणी साडी दिवळीत अधिक उठून दिसेल.
ज्यांना हेवी साड्या नेसायला आवडत नाही, त्यांच्यासाठी हलक्या वजनाची ऑर्गनझा सिल्क साडी बेस्ट आहे.
चंदेरी सिल्क साडी दिवाळीसाठी अत्यंत बेस्ट आहे. यामध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स देखील तुम्हाला मिळतील.
दिवाळीमध्ये तुम्हाला हल्की आणि फॅशनेबल साडी परिधान करायची असेल तर तुम्ही कॉटन- सिल्कमध्ये ऑरेंज साडी परिधान करा. फ्लोरल प्रिंटेड कॉटन-सिल्क साडी निवडावी.