ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
संत्र्याची साल उन्हात वाळवून बारीक करा, त्याचा उपयोग नॅचरल फेसपॅक म्हणून करता येतो.
संत्र्याच्या सालीची पावडर दही किंवा गुलाबपाण्यात मिसळून लावल्याने त्वचा उजळते.
टूथपेस्टमध्ये संत्र्याची साल थोडेसे मिसळल्याने दातांचा सफेदपणा वाढण्यास मदत होते.
संत्र्याची साल घरातल्या खोलीत ठेवाल्याने सुगंध दरवळतो आणि हवा ताजी करतो तसेच डासांना दूर ठेवतो.
संत्र्याची साल पाण्यात उकळून केसांना लावल्याने चमक वाढते आणि कोंडा कमी होतो.
कपडे किंवा शूजमध्ये ठेवलेले संत्र्याची साले वाईट गंध शोषून घेतात आणि एक ताजा सुगंध देतात.
स्वयंपाकघरातील सिंक किंवा स्टोव्हवर संत्र्याची साल घासल्याने बसलेले डाग सहज साफ होतात.