ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बरेचजण वाढलेल्या पोटामुळे त्रस्त आहेत. धावपळीच्या जीवनात वेळेच्या अभावी फिट राहण्यासाठी व्यायाम करणे सर्वांनाच शक्य होत नाही.
पोटाच्या घेऱ्यामुळे हवेतसे कपडे घालता येत नाहीत. पोटाची चरबी कमी करण्यासाठी काहीजण वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतात पण यासगळ्याचा काहीही उपयोग होत नाही.
तुमच्या रोजच्या आहारात या एका फळाचा समावेश केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.
व्हिटॅमिन सी आणि फायबरने परीपूर्ण असलेले संत्रे हे फळ शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास अतिशय उपयोगी ठरते.
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे संत्रे खाल्ल्याने पोट जास्तवेळ भरलेले राहते आणि कमी भूक लागते. अतिरिक्त खाणे टाळले जाते.
संत्र्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खुप कमी असते. यामुळे शरीरातील चरबी वाढत नाही. हेल्थ कॉन्शस लोकांसाठी संत्रे एक उत्तम पर्याय आहे.
रोज एक संत्रे खाल्ल्याने त्यातील फायबरमुळे पचन सुधारते. ज्यामुळे शरीरातील नको असलेले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
संत्र्यामध्ये रोप्रतिकारकशक्ती वाढवणारे व्हिटॅमिन सी असते. जे अन्नाला ऊर्जेमध्ये रूपांतरित करणारी चयापचय क्रिया सुधारते. ज्यामुळे शरीराला पोषक तत्त्व मिळतात.
संत्री वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे, पण त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. ज्यांना ऍलर्जी आहे त्यांनी संत्री खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.