Orange Benefits: आंबट- गोड संत्रा खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

Manasvi Choudhary

आंबट- गोड संत्री

आंबट- गोड संत्रीचा सिझन सुरू झाला आहे. बाजारात संत्री पाहायला मिळतात. संत्री केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.

Orange Benefits | Google

पौष्टिक घटक

संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स भरपूर हे पौष्टिक घटक असतात .

Orange Benefits | freepik

संत्री खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जर तुम्ही नियमितपणे संत्री खाल्ली तर आरोग्याला काही फायदे होतात ते कोणते जाणून घ्या.

Orange Benefits | Yandex

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सर्दी, खोकला या आजारांपासून बचाव होतो.

orange Fruits | Google

त्वचा चमकदार आणि निरोगी राहते

संत्र्यांमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री-राडिकल्सपासून वाचवतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते. त्वचा चमकते.

Soft skin | pinterest

पचनक्रिया सुधारते

संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाण असते. त्यामुळे संत्रे खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत चालते, बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

Digestion

हृदयाचे आरोग्य सुधारते

संत्र्यामध्ये असलेले पोटॅशियम आणि फ्लेव्होनॉईड्स असते ज्यामुळे शरीराचे संपूर्ण रक्ताभिसरण सुधारते आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Heart Health

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

संत्र्यामध्ये असणारे व्हिटॅमिन 'ए' आणि सायट्रिक ॲसिड असते. जे डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करतात.

eyes | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Egg Storage Tips: अंडी फ्रिजमध्ये की फ्रिजबाहेर ठेवावी? जाणून घ्या

Egg Storage Tips
येथे क्लिक करा..