Manasvi Choudhary
अंडी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानली जातात. आहारात अंडी खाल्ल्याने शरीराल आवश्यक ती प्रथिने मिळतात.
परंतु, बाजारातून अंडी आणल्यानंतर आपण चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवतो. ज्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते.
अनेकांना अंडी फ्रिजमध्ये की फ्रिजच्याबाहेर नेमकी कुठे ठेवावी? असा प्रश्न पडतो?
हवामानाच्या पद्धतीनुसार अंडी साठवून ठेवावी. जर वातावरणात गारवा असेल म्हणजेच हिवाळा सुरू असेल तर नॉर्मल टेम्परेचर मध्ये अंडी ठेवावी.
पावसाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान जास्त असल्यामुळे अंडी बाहेर ठेवल्यास ती लवकर खराब किंवा कुजण्याची शक्यता असते. अशा वेळी अंडी नेहमी फ्रिजमध्ये ठेवावी.
अंडी फ्रिजमध्ये ठेवताना प्लास्टिकच्या पिशवीत किंवा फ्रीजच्या दरवाजाच्या रॅकवर ठेवण्यापेक्षा फ्रिजच्या आतील बाजूस ठेवावी.
फ्रिजमधून काढलेली अंडी लगेच उकडू नका. रूमच्या सामान्य टेम्परेचरमध्ये ठेवा.