Siddhi Hande
सणासुदीच्या दिवसात तुम्ही घरच्या घरी बर्फी बनवू शकतात. सध्या बाजारात संत्रीदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही संत्रा बर्फी बनवा.
सर्वात आधी सर्व संत्र्याच्या साली काढून घ्या. त्यानंतर त्यातील पल्प काढून घ्या.
यानंतर गॅसवर कढई तापायला ठेवा. त्यात संत्र्याचा पल्प टाका आणि व्यवस्थित शिजवून घ्या.
यानंतर पल्पला उकळी आली तर त्यात साखर टाकून छान मिक्स करा. यात ऑरेंज फूड कलर मिक्स करा.
यानंतर सर्व मिश्रण मिक्स करा. त्यात खोबऱ्याचा किस टाका आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करा.
यानंतर त्यात संत्र्याच्या सालीचा थोडासा किस टाका. त्यानंतर खवा टाका.
यानंतर मिश्रण नीट हलवून घ्या. मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करा.
एका ताटाला तूप लावून घ्या. त्यावर हे मिश्रण छान थापून घ्या. त्यावर चांदीचा वर्ख लावा.
यानंतर मिश्रण छान सेट झालं की संत्रा बर्फी कापून घ्या.