ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजणांचे दात पिवळे असतात. पिवळ्या दातांमुळे माणसात स्वतःलाच लाज वाटते.
दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा.
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलाच मीठ मिसळून ते ५ मिनिटे दातांवर चोळावे.
दात पांढरेशुभ्र दिसण्यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा आणि त्यात लिंबाचा रस टाका. हे दोन्ही मिश्रण दातांना लावावे.
लवंग आणि वेलची ही दातांसाठी चांगली असते. लवंग आणि वेलची खाल्याने तुमच्या दातांची दुर्गंधी दूर होते.
दात निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दात घासताना कडुलिंबाच्या काडीचा वापर करु शकतात. यामुळे दात पांढरेशुभ्र दिसतात.
दातांचा पिवळेपणा दूर होण्यासोबतच दात निरोगी ठेवणे खूप गरजेचे असते. त्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन वेळा ब्रश केला पाहिजे.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.