Dhanshri Shintre
जगातील कोणत्याही ठिकाणी श्वानाचा अभाव नाही. प्रत्येक ठिकाणी श्वानप्रेमी माणसं आणि त्यांचे श्वान दिसतात.
काही लोक श्वान पाळतात, त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या देखील वाढत आहे.
पूर्वी शिकार आणि घराच्या राखणीसाठी कुत्रे पाळले जात होती. आजही घराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कुत्रे पाळली जातात, ज्यामुळे त्यांचे महत्व कायम आहे.
जगभरात विविध कुत्र्यांच्या प्रजाती आहेत, त्यातील काही अत्यंत महाग आहेत. श्वान खरेदीसाठी दहा हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्यांचा नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी, काही देशांमध्ये त्यासंबंधी कायदे करण्यात आले आहेत.
तुम्हाला माहीत आहे का? भारतात एक असा भाग आहे जिथे कुत्रे एकही ठिकाणी दिसत नाही.
लक्षद्वीप असं याचं उत्तर आहे. लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे, जिथे कुत्र्यांचा आढळ नाही.
लक्षद्वीप सरकारने रेबीजचा प्रकोप टाळण्यासाठी 'डॉग फ्री स्टेट' धोरण तयार केले आहे, ज्यामुळे तेथे कुत्र्यांचा पूर्णपणे वापर करणे टाळले जाते.
येथे दिलेली माहिती सामान्य माहिती वर आधारित आहे साम टीव्ही मराठी याचा कोणताही दावा करत नाही.