Dhanshri Shintre
तुम्ही कधी लक्ष दिलंय का, पाळीव कुत्रे अनेकदा गवत खाताना दिसतात? पण ते असं नेमकं का करतात? यामागचं कारण अनेकांना माहीत नसतं. चला, या वागण्यामागचं गुपित आणि त्याचे संभाव्य कारणे समजून घेऊया.
काही कुत्र्यांना गवताची चव आवडते, त्यामुळे ते अधूनमधून गवत खातात. हळूहळू त्यांना ही सवय लागते आणि हे वर्तन त्यांच्या नैसर्गिक सवयींपैकी एक बनते.
कुत्रे कधी कधी गवत खातात कारण त्यामध्ये फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वे असतात, जे त्यांच्या पचनासाठी फायदेशीर ठरू शकतात.
गवत खाल्ल्याने कुत्र्याच्या पचनास मदत होते आणि कधी कधी ते नैसर्गिकरित्या पोट साफ करण्यासाठीही गवत खातात.
कुत्रे कधी कधी गवत खाल्ल्यानंतर उलट्या करतात, पण हा त्रास प्रत्येक कुत्र्याला होतोच असे नाही. काही कुत्रे सहज पचवू शकतात.
कुत्रे तणाव किंवा चिंता असल्यास गवत खाऊ शकतात. हे त्यांना भावनिक स्थिरता मिळवण्यास मदत करू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
कुत्र्यांसाठी गवत खाणे सामान्य आहे, परंतु त्यावर किटकनाशकांची फवारणी नाही याची खात्री करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते सुरक्षित राहतील.