Siddhi Hande
रोज नाश्त्याला नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही उत्तप्पा बनवू शकतात.
ओनियन उत्तप्पा बनवण्यासाठी सर्वात आधी तांदूळ, उडीद डाळ आणि थोडी मेथी भिजत ठेवा. ६-७ तास छान भिजू द्या.
यानंतर तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात थोडं पाणी टाका.
यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढा. त्यात चिरलेला कांदा, टॉमेटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्स करा. यात थोडं मीठ टाका.
यानंतर नॉन स्टिक तवा घ्या.त्यावर थोडं तेल पसरवून घ्या. त्यावर पीठ पसरवून घ्या.
याचसोबत तुम्ही हे पीठ तव्यावर पसवून घ्या. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो पसरवून घ्या.
यानंतर उत्तप्पा छान दोन्ही बाजूने भाजून घ्या.हा उत्तप्पा तुम्ही खोबऱ्याची चटणीसोबत खाऊ शकतात.