Onion Rings Recipe: लहान मुलांसाठी सुट्टीच्या दिवशी बनवा टेस्टी कुरकुरीत अनियन रिंग्स, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

अनियन रिंग्स बनवण्यासाठी २ मोठे कांदे, अर्धा कप मैदा, २ चमचे कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, पाणी, ब्रेडक्रम्ब्स आणि तळण्यासाठी तेल घ्या.

Crispy Onion Rings

कांद्याच्या गोल चकत्या कापा

कांद्याची साल काढून त्याचे गोलाकार काप करा. प्रत्येक चकती रिंग्समध्ये वेगळी करा. रिंग्स तुटणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर कांद्याच्या चकत्या स्वच्छ आणि कोरड्या कपड्यावर ठेवा.

Crispy Onion Rings

मैद्याचे मिश्रण तयार करा

एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, काळी मिरी पावडर आणि मीठ एकत्र करा. त्यात थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्टसर मिश्रण तयार करा. मिश्रण खूप पातळ नसावे, अन्यथा कांद्याला व्यवस्थित कोटिंग लागणार नाही.

Crispy Onion Rings Recipe

कांद्याच्या रिंग्सना कोटिंग करा

कांद्याच्या प्रत्येक रिंगला तयार केलेल्या मैद्याच्या मिश्रणात बुडवा. त्यानंतर रिंग्सवर ब्रेडक्रम्ब्स व्यवस्थित लावा. अधिक कुरकुरीतपणा हवा असल्यास ब्रेडक्रम्ब्सचे कोटिंग पुन्हा एकदा करता येते.

crispy onion rings recipe | google

तेल योग्य तापमानाला गरम करा

कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर एक रिंग घालून तपासा. तेल खूप थंड असल्यास रिंग्स तेलकट होतात आणि खूप गरम असल्यास बाहेरून पटकन तपकिरी होऊन आतून योग्य प्रकारे शिजत नाहीत.

Crispy Onion Rings Recipe

रिंग्स सोनेरी आणि कुरकुरीत तळा

तयार रिंग्स गरम तेलात थोड्या थोड्या प्रमाणात सोडा. त्या दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर त्या झाऱ्याने बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.

Besan Onion Rings

सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा

तयार अनियन रिंग्स टोमॅटो केचप, मेयोनेझ किंवा चटपटीत डिपसोबत सर्व्ह करा. चहाच्या वेळेस, पार्टीमध्ये किंवा पाहुण्यांसाठी हा झटपट स्नॅक्स बनवता येतो. रिंग्स अधिक कुरकुरीत लागण्यासाठी त्या गरमागरम खाव्यात.

Onion Rings Recipe

10K Steps vs Cardio: १० हजार स्टेप्स चालणे की ३० मिनिटे कार्डिओ? वजन कमी करण्यासाठी कोणती उपाय आहे बेस्ट?

10000 Steps vs Cardio | एोोस ऊन
येथे क्लिक करा