Manasvi Choudhary
कांदा - बटाट्याची भाजी ही चविष्ट लागते. तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवू शकता.
कांदा - बटाट्याच्या भाजीची कशी बनवायची ही रेसिपी स्टेप बाय स्टेप या वेबस्टोरीत पाहूया.
सर्वातआधी तुम्हाला बटाटे सोलून त्याचे बारीक तुकडे करून उकडून घ्यायचे आहेत.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हळद आणि मसाला हे मिश्रण परतून घ्या.
कांदा जास्त करपू न देता फक्त मऊ आणि हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत मध्यम आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या.
संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या नंतर त्यातं बटाटे मिक्स करा. मिश्रणात चवीनुसार मीठ मिक्स करा.
कढईवर झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजवा. नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घरी चमचमीत कांदा- बटाटा भाजी तयार होईल.