Manasvi Choudhary
केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस निर्जीव दिसणे या केसांच्या समस्येने आजकाल सर्वजण त्रस्त झालेले आहेत.
अनेक महागडी उपाय करून देखील या समस्या कमी होत नाही अशावेळी तुम्ही घरगुती सोपा उपाय करून पाहा.
कांद्याचा वापर केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. कांद्याचा रस करून केसांना लावल्याने केसांमध्ये काय बदल होतो ते या वेबस्टोरीमध्ये जाणून घ्या.
कांद्यामधील गुणधर्म केसांच्या मुळांना पोषण देतात यामुळे केसांची वाढ होते, केस मजबूत होतात.
केसांना कांद्याचा रस लावल्याने केस आणि टाळू कोरडा होत नाही यामुळे केसांतील कोरडेपणा कमी आणि टाळूची जळजळ कमी होते.
कांद्याच्या रसामध्ये जिवाणूनाशक आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात ज्यामुळे केसांतील कोंडा आणि खाज कमी होते.
कांद्याच्या रसमध्ये तुम्ही मध आणि कोरफड मिक्स करून केसांना लावू शकता.
कांद्याचा रस केसांना आणि टाळूला लावत असाल तर ते ३० मिनिटे राहू द्या त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
कांद्याचा रस केसांवर रात्रभर कधी ठेवू नका म्हणजे फायदा होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.