Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला कामामुळे फिरण्यासाठी जास्त वेळ मिळत नसेल तर तुम्ही पुढचा One Day Trip लगेचच फॉलो करा.
तुम्ही ५:३०-६:०० सकाळच्या वेळेस पर्यटनाला जाऊ शकता. त्याने तुम्हाला ट्रॅफीक मिळणार नाही.
मुंबईहून पुण्यापर्यंत Expressway मार्गे प्रवासासाठी तुम्हाला ३ तास लागू शकतात.
तुम्ही खोपोली किंवा लोणावळा मार्गावर नाश्ता करू शकता. त्यात पावभाजी, मिसळपाव, गरमा गरम वडापाव खाऊ शकता.
तुम्ही पुण्यात पर्वती टेकडीच्या पायथ्याशी पोहोचल्यावर तुम्हाला पार्किंगची सोय दिसेल.
सुमारे १०० ते १५० पायऱ्या चढून देवदेवेश्वर मंदिर, पेशवे संग्रहालय आणि सुंदर पावसातले व्यू पॉईंट पाहू शकता.
फर्ग्युसन कॉलेज रोड किंवा नारायण पेठ परिसरात पारंपारिक महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद लुटा.
संध्याकाळी स्थानिक ठिकाणी म्हणजेच लक्ष्मी रोड, शनिवार वाडा, सारसबाग येथे फिरायला जा.
संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान पुण्याहून पुन्हा परतीचा प्रवास करा. पाण्याची बाटली, स्नॅक्स, कॅमेरा आणि सनस्क्रीन घेऊन जा.