Sakshi Sunil Jadhav
लहान मुलं असो वा मोठ्या सगळ्यांनाच फ्रेंच फ्राइज खायला प्रचंड आवडतात.
पुढे आपण सोप्या पद्धतीने स्ट्रीट स्टाईल चिली पोटॅटो रेसिपी कशी बनवायची हे मिनिंटात जाणून घेणार आहोत.
बटाटे, तेल, लाल तिखट, लसूण, लाल तिखट, कॉर्न फ्लोअर, मैदा, कांद्याची पात, मीठ, काळी मिरी पावडर, पांढरे तीळ, व्हिनेगर, सोया सॉस, टोमॅटो केचप इ.
बटाटे स्वच्छ धुवून फ्राइजच्या आकाराने कापून घ्या.
एका बाउलमध्ये कॉर्न फ्लोअर, मैदा, लाल तिखट, मीठ आणि बटाटे एकत्र करून कोट करून घ्या.
आता कढईत तेल गरम करा. तेल चांगलं तापलं तर त्यामध्ये बटाटे फ्राय करून घ्या.
बटाटे अर्धवट फ्राय करा. मग ते एका कागदावर काढून घ्या.
आता एका भांड्यात कॉर्न फ्लोअर, काळी मिर्ची पावडर आणि पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. त्यात बटाटे कोट करा. आता पुन्हा हे बटाटे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा.
आता कढईमध्ये १ चमचा तेल गरम करून लसूण, चिली फ्लेक्स, पांढरे तीळ, सोया सॉस, टमाटर केचप आणि रेड चिली पेस्ट मिसळा.
शेवटी त्यामध्ये बटाट्याचे काप मिक्स करून दोन मिनिटे हाय फ्लॅमवर तळून रेसिपी तयार करा.