Dhanshri Shintre
समाजहितासाठी अपार संघर्ष सहन करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे खरे अर्थाने समाजसुधारणेचे प्रतीक ठरले.
प्रचंड विरोध सहन करतही महात्मा फुले डगमगले नाहीत; त्यांनी मुलींसाठी भारतात पहिली शाळा सुरू केली.
11 एप्रिल 1827 रोजी जन्मलेल्या महात्मा फुले यांची जयंती दरवर्षी सामाजिक परिवर्तनाच्या प्रतीक म्हणून साजरी होते.
महात्मा फुले यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे काही मौल्यवान विचार जाणून घेऊया.
विद्वेविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्वेने केले.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.
नवे विचार रोज जन्म घेतात, पण त्यांची अंमलबजावणी करणे, कृतीत आणणे हेच खरे आव्हान ठरते.
भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे.
समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.