Manasvi Choudhary
'ओम' हा केवळ एक अध्यात्मिक किंवा धार्मिक मंत्र नसून, तो एक वैश्विक ध्वनी आहे. ज्याचा उच्चार केल्याने मानसिक, शारीरिक आणि वैज्ञानिक फायदे होतात.
'ओम' चा उच्चार करताना शरीरात निर्माण होणारी कंपने मनावर आणि शरीरावर परिणाम करतात.
'ओम' हा शब्द अ, उ, म या तीन अक्षरांनी बनलेला आहे. जेव्हा ही तीन अक्षरे एकत्र उच्चारली जातात तेव्हा शरीराच्या वेगवेगळ्या भागात विशिष्ट कंपने निर्माण होतात.
जेव्हा तुम्ही 'अ' चा उच्चार करता, तेव्हा छाती आणि पोटाच्या भागात कंपने जाणवतात. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि पचनक्रिया सुधारते.
जेव्हा तुम्ही ओठ बंद करून 'म' चा उच्चार करता, तेव्हा त्याची कंपने थेट मेंदू आणि कवटीच्या भागात निर्माण होतात. या कंपनाने मन शांत होते.
उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी 'ओम' चा उच्चर केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.