Manasvi Choudhary
नारळीपौर्णिमा सणानिमित्त तुम्ही विविध गोड पदार्थ बनवू शकता.
ओल्या नारळाच्या वड्या बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी खोबऱ्याचा कीस, गूळ, दूध, साजूक तूप, बदाम हे साहित्य घ्या.
गॅसवर पॅनमध्ये साजूक तूपामध्ये ओल्या नारळाचा कीस टाकून मिश्रण परतून घ्या.
नंतर या मिश्रणात दूध आणि गूळ घाला. संपूर्ण मिश्रण एकत्र मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण १० मिनिटे परतून घ्या. गॅस बंद करा.
मिश्रण थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये तूप लावा आणि हे मिश्रण त्यावर पसरवून घ्या.
मिश्रण सेट झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने त्याचे चौकोनी तुकडे करा.
अशाप्रकारे ओल्या नारळाची वडी सर्व्हसाठी तयार आहे.