Manasvi Choudhary
अनेकदा साड्या कितीही जुन्या झाल्या तरी त्या फेकून द्यायचं मन होत नाही अशावेळी तुम्ही जुन्या काठपदरी साड्यांचे सुंदर घागरा ड्रेस शिवू शकता.
आजी किंवा आईच्या जुन्या सांड्याचे तुम्ही पुन्हा वापर करून त्याचे घागरा चोली पॅटर्न शिवू शकता. सध्या हे फार ट्रेडिंग लूक आहे.
मराठमोळ्या पारंपारिक लूकसाठी घागरा चोलीचे अनेक पॅटर्न्स तुम्ही निवडू शकता.
कालीदार घागरा हा पैठणी साडीचा तुम्ही शिवू शकता. याला साडीचे काठ घागऱ्याच्या खालच्या बाजूला लावल्याने मराठमोळा लूक वाटतो.
जुन्या शालू साडीचा तुम्ही नवीन घागरा तयार करून शकता मॉडर्न स्टाईलमध्ये यावर कॉन्ट्रास्ट ओढणी घ्या.
तुम्हाला हटके आणि मॉडर्न स्टाईल करायची असल्यास तुम्ही साडीच्या पदराचा जॅकेट शिव शकता हा लूक खास रिस्पेशन, नामकरण सोहळा या सणावारासाठी भारी दिसेल.
साडीचाच घागरा आणि साडीचा ब्लाऊज असा सेम पॅटर्न तुम्ही निवडू शकता हळदी किंवा लग्नसमारंभासाठी हा लूक करा.
जुन्या काठपदर साडीपासून तुम्ही खास साऊथ इंडियन स्टाईल घागरा शिवून घेऊ शकता.