Brass Bangles : ना घासणे, ना पॉलिशचा खर्च! दिवाळीपूर्वी पितळेच्या जुन्या बांगड्या मिनिटांत चमकतील नव्यासारख्या, वापरा 'हा' देसी उपाय

Shreya Maskar

दिवाळी

दिवाळीच्या सणात पारंपरिक दागिने घालण्याची मजाच वेगळी असते. मात्र, बऱ्याचदा पितळाच्या जुन्या बांगड्या काळपट पडतात किंवा त्यांची चमक कमी होते. अशावेळी महागड्या पॉलिशचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करा.

Diwali | pinterest

लिंबाचा रस- मीठ

एका छोट्या वाटीत थोडा लिंबाचा रस घ्या. त्यात चिमूटभर मीठ मिसळा. मऊ कापडाने बांगडीवर हलकेच लावा. लगेच स्वच्छ पाण्याने धुऊन पूर्णपणे कोरडी करा. लिंबाच्या रसातील आम्ल आणि मिठामुळे काळपटपणा कमी होतो.

Lemon Juice and Salt | pinterest

चिंचेचा कोळ

थोडी चिंच कोमट पाण्यात भिजवा. तिचा मऊ कोळ तयार करा.बांगडीच्या छोट्या, नजरेस न पडणाऱ्या भागांवर लावा. योग्य वाटल्यास मऊ कापडाने हलकेच लावा आणि लगेच धुऊन कोरडी करा.

Tamarind Pulp | pinterest

बेसन

तुम्ही बेसनात चिंचेचा कोळ मिक्स करून तयार मिश्रण बांगड्यांना लावू शकता. थोड्याच वेळात पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडे करा.

Gram Flour | pinterest

डिशवॉश लिक्विड- कोमट पाणी

कोमट पाण्यात डिशवॉश लिक्विडचे एक-दोन थेंब मिसळा. मऊ कापड त्या पाण्यात ओले करून पिळून घ्या. बांगडी हलक्या हाताने पुसा. स्वच्छ ओल्या कापडाने पुसून लगेच कोरडी करा.

Dishwash Liquid and Warm Water | pinterest

बेकिंग सोडा- पाणी

बेकिंग सोड्यात पाणी घालून पातळ पेस्ट बनवा.आधी बांगडीच्या लपलेल्या भागांवर लावा. मऊ कापडाने अतिशय हलके लावा. लगेच धुऊन पूर्णपणे कोरडे करा.

Baking Soda and Water | pinterest

मायक्रोफायबर कापडा

बांगड्यांवरील धूळ आणि बोटांचे डाग कमी करण्यासाठी मऊ मायक्रोफायबर कापड उपयोगी ठरू शकते. बांगडी हलक्या हाताने पुसा. पृष्ठभागावर जास्त दाब देऊ नका. वापरल्यानंतर बांगड्या कोरड्या डबीत ठेवा.

Microfiber Cloth | pinterest

'या' गोष्टी लक्षात ठेवा

सोन्याचा मुलामा, रंग, वार्निश किंवा सजावटीचे खडे असतील तर आंबट पदार्थ आणि बेकिंग सोडा वापरू नका. बांगड्या जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवू नका.

Keep these points in mind | pinterest

NEXT :  कानात सतत येतोय शिट्टीसारखा आवाज? दुर्लक्ष करू नका, शरीर देतंय 'या' गंभीर आजाराचे संकेत

Tinnitus | AI PHOTO
येथे क्लिक करा...