Monsoon Skin Tips: पावसाळ्यात तेलकट त्वचेची समस्या? जाणून घ्या घरच्या घरी वापरता येणारे प्रभावी उपाय

Dhanshri Shintre

तेलकट त्वचा

पावसाळ्यात तेलकट त्वचा समस्या वाढते, पण सोप्या घरगुती उपायांनी ती कमी करता येऊ शकते, जाणून घ्या कशी.

मुलतानी माती फेसपॅक

पावसाळ्यात तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीचा फेसपॅक वापरा, जो चेहऱ्यावरील घाण आणि तेल कमी करतो.

लिंबू, मध फेसपॅक

लिंबू तेलकटपणा कमी करतो, मध त्वचेला नमी देतो. लिंबू-मधाचा फेसपॅक १५ मिनिटे लावा, नंतर धुवा.

कोरफड जेल

कोरफडी जेल त्वचेला थंडावा देतो आणि तेलकटपणा कमी करतो, दररोज रात्री झोपेपूर्वी चेहऱ्यावर लावा.

चहाच्या झाडाचे तेल

चहा झाडाच्या तेलात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ते तेलकट त्वचेला नियंत्रित करून मुरुमे कमी करतात, नारळाच्या तेलात मिसळा.

बेसन आणि दही

पावसाळ्यात तेलकट त्वचेसाठी १ चमचा दही आणि २ चमचे बेसन मिसळून फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावा.

गुलाबपाणी

गुलाबपाणी नैसर्गिक टोनर आहे, ते तेलकट त्वचेला थंडावा आणि ओलावा देऊन त्वचा ताजी ठेवते.

NEXT: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

येथे क्लिक करा