Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

Dhanshri Shintre

काळजी घेणे

किडनी शरीरातील विषारी घटक आणि घाण फिल्टर करते, म्हणून तिची योग्य काळजी घेणे आरोग्यासाठी अत्यावश्यक असते.

किडनी इन्फेक्शन

किडनी इन्फेक्शन हा गंभीर संसर्ग असून वेळेवर उपचार न केल्यास किडनीचे नुकसान होऊ शकते, लक्षणे ओळखा.

ताप येणे

किडनी संसर्गात सर्वसामान्य लक्षण म्हणजे अचानक ताप येणे, थंडी वाजणे आणि अंग थरथरणे अशी लक्षणे दिसून येतात.

वारंवार लघवी होणे

वारंवार लघवीची भावना येणे आणि प्रत्येक वेळी थोडीच लघवी होणे हे किडनी इन्फेक्शनचे सामान्य लक्षण आहे.

लघवी करताना जळजळ

लघवी करताना जळजळ, दुखणे किंवा चटके वाटल्यास ते मूत्रपिंड संसर्गाचे संकेत असू शकतात.

मळमळ आणि उलट्या

किडनी संसर्गामुळे अनेकदा पोटात त्रास होतो आणि मळमळ, उलट्या किंवा अपचनासारखी लक्षणे दिसून येतात.

लघवीचा रंग बदलणे

दुर्गंधीयुक्त, गडद पिवळा किंवा रक्तमिश्रित लघवी ही किडनी संसर्गाची शक्यता दर्शवणारी लक्षणे असू शकतात.

थकवा आणि अशक्तपणा

थकवा, आळस आणि ऊर्जा कमी होणे ही लक्षणे शरीरात संसर्ग सुरू असल्याचे संकेत देत असतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: सततच्या कामाच्या धावपळीमुळे त्रासला आहात? 'या' पदार्थाचे सेवन करा अन् बघा फायदे

येथे क्लिक करा