High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Shreya Maskar

ऑक्टोबर उष्णता

ऑक्टोबरमध्ये उष्णता आणि दमटपणा वाढल्याने रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. उष्णतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हृदय, रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येऊन रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतात.

October heat | pinterest

ऑक्टोबर हीट

ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून ऑक्टोबर हीटमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे हार्ट , डायबिटीज , हाय बीपीच्या रुग्णांनी आपली विशेष काळजी घ्यावी.

BP | pinterest

रक्तदाब कमी होऊ शकतो

उष्णतेमध्ये त्वचेतील रक्तवाहिन्या रुंदावतात आणि घामामुळे शरीरातील द्रव कमी होतो. त्यामुळे काही हाय ब्लड प्रेशर कमी होऊन चक्कर, अशक्तपणा किंवा बेशुद्ध पडण्याचा धोका वाढतो.

Blood pressure may drop | pinterest

डिहायड्रेशन

पुरेसे पाणी न घेतल्यास शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. बीपी नियंत्रित करण्यासाठी काही औषधे उष्णतेमध्ये डिहायड्रेशनचा धोका आणखी वाढवू शकतात.

dehydration | pinterest

हृदयावर अतिरिक्त ताण

उष्णतेमुळे हृदय व रक्ताभिसरण यंत्रणेवर ताण वाढतो. हृदयविकार असलेल्या व्यक्तींमध्ये उष्णतेमुळे हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो.

Extra stress on the heart | pinterest

'या' गोष्टींची 'घ्या' काळजी

छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, बेशुद्ध पडणे, गोंधळ उडणे, अचानक अशक्तपणा किंवा स्ट्रोकची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

'Take' care of these things | pinterest

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात बीपी रुग्णांनी भरपूर पाणी प्या. तसचे ठरावी अंतराने दिवसभर पुरेसे द्रवपदार्थ घ्या. यात फळांचे ज्यूस आणि सूप यांचा समावेश असावा.

Drink plenty of water | pinterest

बाहेर जाताना 'ही' घ्या काळजी

शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर पडताना सावली, हलके कपडे आणि टोपीचा वापर करा. बीपी नियमित तपासा.

Take care when going out | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

October Heat | Google

NEXT : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! चहा प्यायल्यानंतर हृदयाची धडधड वाढते? दुर्लक्ष करणे पडेल महागात

Heart-Tea | AI PHOTO
येथे क्लिक करा...