Manasvi Choudhary
ओट्स उत्तपम नाश्त्यासाठी पौष्टिक अन् हेल्दी डिश आहे. तुम्ही घरीच अत्यंत सोप्या पद्धतीने ओट्स उत्तपम बनवू शकता.
ओट्स उत्तपम बनवण्यासाठी ओट्स, कांदा, गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ, तेल, शिमला मिरची, पनीर, दही हे साहित्य घ्या.
ओट्स उत्तपम बनवण्यासाठी सर्वात आधी मिक्सरमध्ये ओट्स बारीक करा. त्यानंतर एका प्लेटमध्ये ओट्सच्या पावडरमध्ये रवा मिक्स करून घ्या
या मिश्रणात दही आणि पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये चवीनुसार मीठ घाला.
उत्तपम बनवण्यासाठी गॅसवर पॅनवर हे मिश्रण गोलाकार आकारात पसरवून घ्या. या मिश्रणात नंतर गाजर, पनीर, हिरवी मिरची हे देखील मिक्स करून घ्या.
सर्व मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या दोन्हीबाजूने उत्तपम कुरकुरीत झाल्यानंतर सर्व्ह करा.