Shreya Maskar
थंडीत नाश्त्याला चटपटीत आणि हेल्दी खावेसे वाटत असेल तर ओट्स उपमा हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील.
ओट्स उपमा बनवण्यासाठी ओट्स, जिरे, मोहरी, काजू , कढीपत्ता, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरच्या, कांदा, शिमला, गाजर, हळद, वाटाणा, पाणी, कोथिंबीर, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
ओट्स उपमा बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवून तेल गरम करा. यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता फोडणीला टाका.
आता गॅस कमी करून त्यात आल्याची पेस्ट, हिरवी मिरची, कांदा टाकून मिक्स करा. कांदा जळणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर उपमा कडू होईल.
या मिश्रणात चिरलेल्या भाज्या, शिमला मिरची, गाजर, फरसबी, वाटाणा, काजूचे तुकडे , हळद, मीठ घालून चांगले परतून घ्या. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ देखील टाकू शकता.
भाज्या शिजून झाल्यानंतर त्यात पाणी टाकून ५ ते १० मिनिटे उकळून घ्या. शेवटी यात ओट्स टाकून ते नीट शिजवून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवून द्या.
५ मिनिटांनी यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून गरमागरम ओट्स उपम्याचा आस्वाद घ्या. तुमच्या मुलांना हा उपमा खूप जास्त आवडेल.
तुम्ही ओट्स उपमा अजून टेस्टी बनवण्यासाठी यात काजू, शेंगदाणे देखील टाकू शकता. सकाळचा झटपट बनवता येईल असा हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे.