Shreya Maskar
ओट्स उपमा बनवण्यासाठी ओट्स, कांदा, टोमॅटो, गाजर, मटार, शिमला मिरची, तेल,उडीद डाळ, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
ओट्स उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम ओट्स भाजून घ्या.
पॅनमध्ये तेल , आले, मोहरी, उडद डाळ, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या.
यात कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, गाजर, मटार आणि शिमला मिरची टाकून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
भाज्यांमध्ये भाजलेले ओट्स मिक्स करून ४-५ मिनिटे चांगले शिजवा.
उपम्यात आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.
उपम्याला एक उकळी आल्यावर त्यात कोथिंबीर घालून त्याचा आस्वाद घ्या.
तुम्ही उपम्यावर डाळिंबाचे दाणे आणि शेव टाका.